लाडकी सुन, सुरक्षित सुन — प्रत्येक सुनेला सन्मान, सुरक्षा आणि आधार मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
शिवसेना महिला आघाडी उपक्रम

लाडकी सुन, सुरक्षित सुन

घरातली लेक जितकी लाडकी, तितकीच सुनही लाडकी असायला हवी — या भावनेतून सुरू झालेलं अभियान. सासरी होणाऱ्या अन्याय, छळ आणि हिंसेविरुद्ध प्रत्येक सुनेच्या पाठीशी उभं राहणारं व्यासपीठ.

पूर्णपणे गोपनीय २४x७ उपलब्ध पोलीस समन्वय कायदेशीर सहाय्य
लाडक्या सुनेचं रक्षण — शिवसेनेचं वचन

रणरागिणी पथक

प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत महिला आघाडीचं जलद प्रतिसाद पथक, पीडित महिलांच्या मदतीसाठी सज्ज.

पार्श्वभूमी

अभियान कशासाठी?

लाडकी सुन अभियान ही शिवसेना महिला आघाडीची एक सामाजिक चळवळ आहे. सासरी होणारा घरगुती छळ, हिंसाचार आणि अन्याय सहन करणाऱ्या सुनांना वेळेत मदत, आधार आणि न्याय मिळवून देणं, हाच या अभियानाचा उद्देश आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन, पीडित महिलेला तात्काळ दिलासा द्यावा हीच या अभियानाची भूमिका आहे. तक्रार आल्यानंतर स्थानिक पातळीवरची महिला आघाडीची रणरागिणी टीम लगेच संपर्क साधते आणि गरजेनुसार मदत पुरवते.

सासू-सुनेच्या नात्यातही आपुलकी आणि सन्मान असायला हवा — प्रत्येक सुनेला तिच्या हक्काचं घर, आदर आणि सुरक्षितता मिळावी, या विश्वासातून हे अभियान पुढे नेलं जात आहे.

२४x७हेल्पलाईन सेवा
१००%गोपनीयता
जिल्हा स्तररणरागिणी पथक
"
आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते, तशीच सुनही लाडकी असायला हवी — तिला योग्य वागणूक व सन्मानाने वागवायला हवं.
— श्री. एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, शिवसेना पक्ष प्रमुख
आमचं काम

अभियानाचे आधारस्तंभ

तक्रार दाखल करण्यापासुन ते पुनर्वसनापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर सुनांच्या पाठीशी.

हेल्पलाईन व WhatsApp

दोन समर्पित हेल्पलाईन क्रमांक आणि व्हॉट्सॲपद्वारे तात्काळ संपर्काची सोय.

पोलीस समन्वय

स्थानिक पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून तक्रारींवर तातडीने योग्य कारवाई केली जाते.

कायदेशीर व सामाजिक सहाय्य

कायदेशीर सल्ला, समुपदेशन आणि आवश्यकतेनुसार सामाजिक पुनर्वसनासाठी मार्गदर्शन.

रणरागिणी पथक

प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत महिला कार्यकर्त्यांची टीम, पीडितेपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणारी.

नेतृत्व

अभियानाचे मार्गदर्शक व प्रमुख

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे
मार्गदर्शक

श्री. एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
शिवसेना प्रमुख
सौ. मीनाक्षी राजेंद्र शिंदे
अभियान प्रमुख

सौ. मीनाक्षी राजेंद्र शिंदे

शिवसेना लाडकी सुन अभियान महाराष्ट्र राज्य प्रमुख
महिला आघाडी प्रमुख ठाणे जिल्हा
माजी महापौर, नगरसेविका ठा.म.पा.
शिवसेना लाडकी सुन अभियान महाराष्ट्र राज्य प्रमुख महिला आघाडी प्रमुख ठाणे जिल्हा माजी महापौर, नगरसेविका ठा.म.पा.

सौ. मीनाक्षी राजेंद्र शिंदे या ठाणे जिल्ह्यातील एक ज्येष्ठ व अनुभवी शिवसेना नेत्या आहेत. २००७ पासून ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून सातत्याने जनसेवा करीत असून, २०१७ मध्ये त्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून गेल्या. सामान्य घरातून ते महापालिका भवनापर्यंत — जनसामान्यांच्या प्रश्नांशी थेट जोडलेले नेतृत्व हेच त्यांच्या राजकीय वाटचालीचे वैशिष्ट्य राहिले आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबनासाठी सातत्याने काम केले. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांनी लाडकी सुन अभियान सुरू केल्यानंतर या अभियानाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख म्हणून जबाबदारी सौ. मीनाक्षी शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली. “जशी घरची लेक लाडकी, तशीच सुनही लाडकी व सुरक्षित असायला हवी” — या भावनेतून त्यांनी राज्यभरातील महिला आघाडी कार्यकर्त्या व रणरागिणी पथक यांच्यासोबत पीडित सुनांपर्यंत तातडीने मदत पोहोचवण्याचे काम हाती घेतले आहे.

ठाणे मुख्य कार्यालयातून हेल्पलाईन, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन आणि पोलीस समन्वयासह संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. सासरी होणाऱ्या अन्याय, छळ व हिंसेविरुद्ध प्रत्येक सुनेच्या पाठीशी उभे राहणे — हेच सौ. मीनाक्षी शिंदे यांचे अभियानातील ध्येय आणि जीवनकार्य आहे.

"ज्या घरात लेक लाडकी असते, त्याच घरात सुनही लाडकी असायला हवी — हीच आमची भूमिका आहे."
कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हा
कार्यपद्धती

मदत कशी मिळेल?

तक्रार दाखल केल्यापासुन मदत मिळेपर्यंतचे चार टप्पे.

संपर्क साधा

हेल्पलाईन, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे आपली तक्रार नोंदवा.

रणरागिणी पथकाशी संपर्क

स्थानिक महिला आघाडी कार्यकर्ती लगेच संपर्क करून संपूर्ण परिस्थिती समजून घेते.

आवश्यक कारवाई

गरजेनुसार पोलीस, कायदेशीर सल्लागार किंवा समुपदेशकांशी समन्वय साधला जातो.

पाठपुरावा

प्रकरण मार्गी लागेपर्यंत महिला आघाडीकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो.

तात्काळ मदत

तुम्ही एकट्या नाही आहात

घरगुती हिंसा, छळ किंवा अन्यायाचा सामना करत असाल, तर संकोच न करता संपर्क साधा. तुमची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.

आपली ओळख आणि माहिती पूर्णतः गोपनीय राहील
मीडिया कव्हरेज

लाडकी सुन अभियान — बातम्या

विविध वृत्तपत्रे व न्यूज पोर्टल्सवर प्रकाशित झालेल्या बातम्या व लेख

१८ ऑगस्ट २०२५ · Deccan Herald

After Ladki Bahin, Maharashtra rolls out ‘Ladki Sun, Surakshit Sun’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ‘लाडकी सुन – सुरक्षित सुन’ अभियानाची घोषणा केली. हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आणि रणरागिणी पथक मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले.

पूर्ण बातमी वाचा →
१८ ऑगस्ट २०२५ · TV9 Marathi

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सुन योजना — एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ठाण्यात भव्य शुभारंभ. प्रत्येक सुन ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने अभियान सुरू. हेल्पलाईन ८८२८८६२२८८ जाहीर.

पूर्ण बातमी वाचा →
१८ ऑगस्ट २०२५ · पुढारी

‘लाडकी बहीण’ आता ‘लाडकी सुनबाई’ — एकनाथ शिंदेंची ठाण्यात घोषणा

घरगुती हिंसाचाराने त्रस्त महिलांच्या मदतीसाठी अभियान. ठाणे माजी महापौर मीनाक्षी शिंदे अभियान प्रमुख.

पूर्ण बातमी वाचा →
१८ ऑगस्ट २०२५ · लोकसत्ता

‘लाडकी सुन, सुरक्षित सुन’ अभियानाची घोषणा

मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्र्यांनी अभियान सुरू केले. जशी लाडकी बहीण, तशी लाडकी सुनही सुरक्षित असावी.

पूर्ण बातमी वाचा →
१८ ऑगस्ट २०२५ · Zee News Marathi

‘लाडकी बहीण’च्या यशानंतर आता ‘लाडकी सुन’ योजनेची घोषणा

सासरच्या मंडळीकडून छळ सहन करणाऱ्या सुनांना तात्काळ मदत व संरक्षण. हेल्पलाईन व शाखांमार्फत मदत.

पूर्ण बातमी वाचा →
१८ ऑगस्ट २०२५ · NDTV Marathi

‘लाडकी बहीण’ नंतर ‘लाडकी सुनबाई’! काय आहे नवी योजना?

राज्यस्तरीय जबाबदारी ठाणे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे. प्रत्येक शाखेतून मदत मिळणार.

पूर्ण बातमी वाचा →
१९ ऑगस्ट २०२५ · Patrika

‘लाडकी बहीन’ के बाद ‘लाडकी सुनबाई’… क्या है ये नई योजना

ससुराल में अन्याय झेल रही बहुओं की मदद के लिए अभियान. मीनाक्षी शिंदे को जिम्मेदारी सौंपी गई.

पूर्ण बातमी वाचा →
१८ ऑगस्ट २०२५ · तरुण भारत

Shinde’s Ladki Soon scheme — लाडकी सुन अभियान

ठाणे येथे ‘खेळ मंगळागौरीचा’ कार्यक्रमात घोषणा. हेल्पलाईन ८८२८८६२२८८ व ८८२८८९२२८८. जबाबदारी मीनाक्षी शिंदे यांच्याकडे.

पूर्ण बातमी वाचा →
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

  • कार्यालयशिवसेना सूर्य कार्यालय, लाडकी सुन अभियान मुख्य कार्यालय, जांभळी नाका, चरई, जोशीवाडा, ठाणे (प) 400601
  • हेल्पलाईन88288 62288 · 88288 92288
  • उपलब्धतासोमवार ते रविवार — २४ तास

संदेश पाठवा

तक्रार किंवा शंका असल्यास खालील फॉर्म भरा — आमचं पथक लवकरात लवकर संपर्क साधेल.

आपली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.